Ad will apear here
Next
सावडाव झाली सिंधुदुर्गातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचातीला मिळाला आहे. त्यामुळे या गावाचा कारभार पेपरलेस झाला असून, ‘ई-गव्हर्नन्स’च्या ३३ सेवा गावातच मिळणार आहेत.

ग्रामपंचायतीच्या ई-ग्रामसॉफ्ट पंचायत प्रणालीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीया सावंत, सावडावचे सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे, विस्तार अधिकारी अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

‘ग्रामपंचायतीचा कारभार ‘पेपरलेस’ झाल्याने जुने रेकॉर्ड सीलबंद करण्यात आले आहे. यापुढे ‘ई-गव्हर्नन्स’च्या ३३ सेवा गावातच मिळणार आहेत. गावातील विकासकामांवर किती निधी खर्च झाला, याची माहितीही ऑनलाइन मिळणार आहे. गावातील लाभार्थ्यांचे अनुदान किंवा ठेकेदारांची बिलेही थेट बँकेतच जमा होतील. यापुढे धनादेश बंद केले जातील. कोणत्याही प्रशासकीय कामाचा आदेश १५ फेब्रुवारीपर्यंतच दिला जाईल. त्यानंतर काम सुरू केले जाणार नाही. या कामांची बिलेही ३१ मार्चला दिली जातील. त्याच दिवशी वार्षिक व्यवहार पूर्ण होतील,’ असे रणदिवे यांनी सांगितले. 

‘ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांचा हा भाग आहे,’ असेही रणदिवे यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZLQBR
Similar Posts
रानटी हत्तींना मधमाश्यांनी पळवले सिंधुदुर्गातील रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी नवा आणि नैसर्गिक उपाय म्हणून मधुमक्षिकापालन सुरू करण्यात आले आहे. मधुमक्षिकापालन केलेल्या भागांतून मधमाश्यांना घाबरून हत्तींनी काढता पाय घेतला असून, शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधनही मिळाले आहे. आमदार नितेश राणे यांनी मायव्हेट चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने
गावातील दिवाळी! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दिवाळीबद्दल लिहिले आहे कणकवलीतील तुषार हजारे यांनी...
आकाशकंदील उडविण्याची परंपरा असलेली दिवाळी कलमठ (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील कोष्टी समाजबांधवांनी आकाशकंदील उडविण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आजही जपली आहे. या आगळ्यावेगळ्या दिवाळीबद्दल लिहीत आहेत तुषार हजारे...
प्रयत्नांती ‘परमेश्वर’ मिळविणारी ‘त्रिमूर्ती’ मालवण : त्या तीन भावंडांच्या वडिलांची मूर्तिशाळा अनेक वर्षांपासूनची. मुलांना मात्र मूर्तिकामातील फारसा अनुभव नाही. यंदा अचानक वडिलांचे अपघाती निधन झाले आणि त्यांचे छत्रच हरपले; पण खचून न जाता त्या तिघांनी आपल्या वडिलांच्या मूर्तिशाळेची परंपरा सुरू ठेवायचे ठरवले. वडिलांच्या सहकाऱ्यांचा आधार त्यांना मिळाला आणि त्यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language